कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार - पत्रपरिषदेत माहिती
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बरांज कोल माईन्स मध्ये कार्यरत कामगारांच्या मागण्यांवर ए.एल.सी.च्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे संघटने तर्पे खदान मध्ये दि. २७ जानेवारी २०२६ पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
कामगारांच्या रास्त मागण्या के.पी.सी.एल. खान कामगारांना एच.पी.सी. प्रमाणे वेतन देण्यात यावे, नौकरीच्या बदल्यात कपात करण्यात येत असलेले ५ लाख रूपये बेकायदेशिर आहे ते तात्काळ बंद करावे, कपात करण्यात आलेली कामगारांची रक्कम कामगारांना परत करावे, २०१५ ते २०२० या अवधीतील ३८ महिण्याचे थकित वेतन रक्कम अद्याप पर्यंत दिलेले नाही, वेतन तात्काळ कामगारांना देण्यात यावे, २०२०-२०२५ पर्यंतचे कामगरांच्या भविष्य निधीचे स्टेटमेंट जाहिर करावे, ग्रज्युएटी रक्कम केंद्र शासनाच्या घोरणानुसार देण्यात यावी.
वरील मागण्या १५ दिवसाचे आत पुर्ण न झाल्यास संघटने द्वारा खान बंद आंदोलन करण्यात येईल, आदांलनामुळे जी औद्योगिक अशांती निर्माण होईल याची संपूर्ण जबाबदारी के.पी.सी.एल. प्रशासनाची राहील, अशी माहिती उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.






0 Comments