प्राणघातक हल्ला करणार्‍या ‘त्या’ आरोपींना अटक करा

 



प्राणघातक हल्ला करणार्‍या ‘त्या’ आरोपींना अटक करा

◾वाहन चालक मो. जमील मो. गुलाब शेख यांची पत्रपरिषदेत मागण

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  बिनबा गेट जवळील चौराळा मार्गावरील एम. एम. टाईल्स येथील गोदामात माल भरण्यासाठी आपल्या वाहनाने गेला असता वाहन रस्त्याच्या कडेला उभे करताच मिनाज नावाच्या व्यक्तीने वाद घालत शिविगाळ केली. त्यानंतर आपल्या मित्रांना बोलवून तलवार व विटाने चालकाला मारहाण केली. या घटनेत चालक मो. जमील मो. गुलाब शेख जबर जखमी झाले.  यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करुनही अजुनही त्यांच्या दहशतीमुळे जिविताला धोका निर्माण झाला आहे. अश्या आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करावी अशी मागणी वाहन चालक मो. जमील मो. गुलाब शेख यांनी पत्रपरिषदेत केली आहे.

येथील नगीनाबाग परिसरात मो. जमील मो. गुलाब शेख आपल्या कुटूंबासह वास्तव्य करतात. ते स्वतः वाहन चालक असून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते एम.एम. टाईल्स गोदामात माल भरण्यासाठी गेले. त्यासाठी त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याचवेळेस वाहन रस्त्याच्या कडेला का उभे केले म्हणून मिनाज नावाच्या व्यक्तीने त्यांना शिविगाळ केली. तसेच आपल्या सात ते आठ मित्रांना घटनास्थळी बोलवून घेतले. 

त्यावेळी त्यांच्या हातात विटा व तलवार आढळून आली. त्यांनी वाहनासोबतच मो. जमील यांनाही जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला. यात मो. जमील जखमी झाले त्यांनी आरडाओरड केली असता रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमू लागली. त्यामुळे आरोपी पळून गेले. या घटनेनंतर मो. जमील यांना रुग्णायात उपचारासाठी नेण्यात आले. तिथून वापस आल्यानंतर त्यांनी घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतू पोलिसांनी गुन्हा जरी दाखल केला असला तरी आरोपी अजुनही मोकाट असून त्यांच्याकडून जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली.




Post a Comment

0 Comments