चंद्रपूर शहरात मॉर्निंग वॉकदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांचा नागरिकांशी थेट संवाद

 



चंद्रपूर शहरात मॉर्निंग वॉकदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांचा नागरिकांशी थेट संवाद

◾बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानात नागरिकांच्या भेटी

 चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत आज सकाळी बाबूपेठ येथील  अटल बिहारी वाजपेयी उद्यानात मॉर्निंग वॉक करताना नागरिकांशी थेट संवाद साधला. रोजच्या दिनक्रमाचा भाग म्हणून फिरायला आलेल्या नागरिकांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

  यावेळी उद्यानात फिरणार्या ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच व्यायामप्रेमींशी आमदार जोरगेवार यांनी आत्मीयतेने संवाद साधला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, घरपट्टे तसेच परिसरातील मूलभूत नागरी प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली. आमदार जोरगेवार यांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकार्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

   महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ सभा, पदयात्रा किंवा प्रचारापुरते न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला संवाद महत्त्वाचा असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. जनतेशी थेट संपर्क हाच विकासाचा खरा आधार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 नागरिकांशी सकाळच्या प्रसन्न वातावरणात झालेला हा संवाद अनेकांसाठी सुखद अनुभव ठरला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सहज, साध्या आणि लोकाभिमुख वागणुकीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा थेट संपर्कातून जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र या भेटीतून स्पष्ट झाले.




Post a Comment

0 Comments