बल्लारपूर निवडणूक स्ट्राँग रूम परिसरात जॅमर लावा - शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर
◾बल्लारपूर सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना निवेदन
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक ०८/१२/२०२५ रोजी बल्लारपुर शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांना निवेदन सादर करून स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की दि. २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. ३ डिसेंबर २०२५ ला होणार होती, परंतु राज्य निवडणुक आयोगा द्वारे दि. ३ डिसेंबर २०२५ ला दुपारी मतदान सुरू असताना घेण्यात आलेले निर्णयानुसार मतमोजणी ची तरीख पुढे ढकलून २१ दिसंबर २०२५ ला करण्यात आली. सद्यपरीस्थीतीत मत चोरीचा मुद्दा लोकांच्या मनात प्रचंड वेगाने वावरत असून लोकांना ई वी एम मशीन वर भरोसा राहिलेला नाही. तसेच ई वी एम हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असुन व सध्या ई वी एम मध्ये बैटरी लागुन असल्याने लोकांचे म्हणणे आहे की सैटेलाइट किवा मोबाईल इंटरनेट द्वारे ई वी एम हैक होऊ शकते. करीता स्ट्रॉग रूम मध्ये जॅमर लावण्यात यावा ही विनंती करन्यात आली.
सहायक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






0 Comments