आज विविध फुले आंबेडकरवादी संघटनांचे धरणे आंदोलन
◾सोनम वांगचुक आणि न्यायमूर्ती गवई प्रकरणाचा होणार विरोध
◾पत्रपरीषदेत दिलीप वावरे यांची माहीती
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : खोट्या आरोपांवरून पर्यावरणवादी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना अटक करून जोधपूर तुरुंगात ठेवणे आणि ६ ऑक्टोबर रोजी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणे या दोन्ही घटना संविधानाच्या विरोधात आहेत. या घटना लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचविणाऱ्या आहे. याचा निषेध करण्यासाठी चंद्रपूरमधील विविध फुले-आंबेडकरवादी संघटनांनी शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. एडवोकेट राजेश वनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. विविध फुले आंबेडकरवादी संघटनांचे दिलीप वावरे यांनी पत्रकार परिषदेत शिष्टमंडळाला माहिती दिली की त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन पाठवले जाईल.
त्यांनी सांगितले की, संविधानाच्या अवमानाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि नागरिकांच्या संवैधानिक हक्कांवर निर्बंध लादले जात आहेत. लोकशाही व्यवस्था संपवून भारत हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे आणि सध्या अघोषित आणीबाणीच्या स्थितीत आहे. या दोन्ही घटनांमुळे गटाच्या भावना तीव्र झाल्या असून, त्या व्यक्त करण्यासाठी निषेध निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निदर्शनात समता सैनिक दल, भीम आर्मी, फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती, बाणाई, बहुजन हितकारिणी सभा, बहुजन युवा कृती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील संघ, बौद्ध सन्मान कृती समिती, आदी सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.
निदर्शनास वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीप वावरे, किशोर सवणे, सुरेंद्र रायपुरे, राजकुमार जवादे, प्रा.टी.डी.कोसे, नागवंश नगराळे, चेतन उंदिरवडे, अधिवक्ता अशोक फुलझेले, धम्मदीप मेश्राम, अनंत बाभेरे, अधिवक्ता अशोक फुलझेले, आदींनी केले आहे. रवींद्र मोटघरे, विद्याधर लाडे, विवेक कांबळे, बंडू ठमके यांनी पत्रपरिषदेत केले आहे.






0 Comments