Mephedrone Drug अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपी अटक

 








Mephedrone Drug अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपी अटक 

◾एम.डी. ड्रग्स, मोबाईल व वाहन असा एकुण ८५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त

◾पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कामगिरी

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १०/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत Mephedrone Drug हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे गोपनिय माहितीचे आधारावरुन नेताजी चौक बाबुपेठ वार्ड चंद्रपुर येथे नाकाबंदी करुन सापळा रचुन मोटार सायकल क्रमांक एम.एच.३४ बीडब्ल्यु ८६८९ ला थांबवुन पंचासमक्ष चालकांची झडती घेतली असता चालक नामे अविनाश अनुप कुंडु वय १८ वर्ष रा. बाबुपेठ वार्ड चंद्रपूर याचे ताब्यात एकुण ०६.८५ ग्रॅम Mephedrone Drug हा अमली पदार्थ आणि वाहनासह इतर मु‌द्देमाल असा एकुण ८५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 आरोपीविरुध्द पोस्टे चंद्रपूर शहर येथे एन.डी.पी. एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकार चंद्रपूर सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांचे नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, म.पो. हवा. भावना रामटेके, पो. हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, नापोशि. कपुरचंद खरवार, पो. अं. योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, मपोशि. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे.




Post a Comment

0 Comments