माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा अमूल्य वाटा - आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार
◾भाजपा बल्लारपूर तालुकाद्वारा आयोजित रक्षाबंधन कार्यक्रम
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : लाडक्या बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळेच मी आज जनसेवेसाठी सक्षमपणे उभा आहे. माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा अमूल्य वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर नाट्यगृहात, भाजपा बल्लारपूर तालुकाद्वारा आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष रणजयसिंग, महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई जोशी, आरती अक्केवार, कांताबाई ढोके, शिवचंद्र द्विवेदी, जयश्रीताई मोहूर्ले, संध्याताई मिश्रा, रेणुकाताई दुधे, सारिका कणकम, किशोर मोहूर्ले, सतीश कणकम, गुलशन खान, देवेंद्र वाटकर, नजमा खान, उत्तरा सोनटक्के, उन्नती टेकाडे, सुनीता निवलकर, सुरेखा श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, रक्षाबंधनाचा हा पवित्र उत्सव आहे. लाडक्या बहिणींच्या मनातील प्रत्येक इच्छा व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. राखीचा हा धागा हा केवळ प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक नाही, तर रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ असा अतूट बंध आहे. हा दिवस माझ्यासाठी अत्यंत सौभाग्यशाली असून शेकडो लाडक्या बहिणींनी राखी बांधून मला आपुलकीचा मान दिला.
या राखीने माझ्यावर लाडक्या बहिणींचा विश्वास, प्रेम, सुरक्षितता आणि काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. लाडक्या बहिणींच्या कल्याणासाठी स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला आत्मनिर्भर होत आकाशात उंच भरारी घेतील. असा विश्वास देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.
0 Comments