लाडक्या बहिणींच्या पाठिशी सदैव खंबीरपणे उभा राहणार - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार

 








लाडक्या बहिणींच्या पाठिशी सदैव खंबीरपणे उभा राहणार - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार

◾रक्षाबंधनाचा पवित्र धागा म्हणजे प्रेम, विश्वास व नात्यांचे बळ

◾मुल तालुका भाजपाच्या वतीने उत्साहात पार पडला रक्षाबंधन सोहळा

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मी पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहीन. त्यांच्या प्रगतीसाठी काम करताना कोणतीही कसर सोडणार नाही, असा ठाम निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रक्षाबंधन सोहळ्यात व्यक्त केला.

रामलीला सभागृह, मुल येथे भाजपा मुल तालुक्याच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे,भाजपा तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, रत्नमाला भोयर, उषाताई शेंडे, किरण कापगते, भारतीताई लाकडे, वर्षाताई परचाके, वंदनाताई आगरकाटे,प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, मोतीलाल टहलीयानी, अविनाश जगताप, अजय गोगूलवार, चंद्रकांत आष्टनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, रक्षाबंधनाचा पवित्र धागा हा नात्यांना अतूट बळ देणारा आणि प्रेम, विश्वास व नात्यांच्या अद्वितीय बंधाचा प्रतीक आहे. या पवित्र नात्याला जोपासण्यासाठी व बहिणींना योजनांचा लाभ थेट गावात मिळावा, यासाठी फिरते जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. बल्लारपूर विधानसभेत मुली व महिलांसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र स्थापन करून शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध केल्या आहेत.

चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लबमध्ये विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक आरक्षणाची सुविधा, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ, तसेच आरोग्य शिबिरांद्वारे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने बहिणींनी राखी बांधून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती आपुलकीचा मान व्यक्त केला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने शूरवी महाविद्यालय, मुल येथे राखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थिनींनी कुशल हस्तकौशल्यातून साकारलेल्या सुंदर राख्या स्नेहाने बांधत रक्षाबंधनाच्या नात्याला अलौकिक असा गौरव बहाल केला असल्याचे यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.




Post a Comment

0 Comments