रेकॉर्डवरील आरोपी मोटार सायकल वाहन चोर अटक
◾आरोपी नामे आरीफ कलंदर शेख वय २८ वर्ष, रा. वार्ड क्र.०२ ज्योतिबा फुले चौक, गडचांदुर ता. कोरपना
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहरातील भिवापुर वार्ड येथून दिनांक ०२/०८/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. फिर्यादी नामे शेलेन्द्र किसनसिंह चौहान वय ४६ वर्ष, रा.भिवापुर वार्ड चंद्रपूर यांनी त्यांची होन्डा सि.बि. शाईन कंपनीची मोटार सायकल वाहन क्र. MH 49-AC 5296 ही घरासमोरील मोकळया जागेत पार्क केलेली होती. दुसऱ्या दिवशी दि.०३/८/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजताचे सुमारास पाहिली असता, नमुद मोटार सायकल दिसून आली नाही. यावरून फिर्यादी यांनी नमुद मोटार सायकल अज्ञान चोराने चोरून नेली अशी रिपोर्ट पो.स्टे.ला दिल्याने, अपराध क्र. ५५१/२५ कलम ३०३(३) भा.न्या.सं. अन्वये नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयांचे तपासात पो.स्टे. परिसरात रेकॉर्ड वरील आरोपी यांचा कसून शोध घेतला असता, गोपनिय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे आरीफ कलंदर शेख वय २८ वर्ष, रा. वार्ड क्र.०२ ज्योतिबा फुले चौक, गडचांदुर ता. कोरपना याने नमुद मो.सा. चोरून नेलेली आहे. यावरून आरोपीचा शोध घेणे कामी पो.नि. निशिकांत रामटेके यांचे आदेशाने पो. उपनि.विलास निकोडे व डी. बी. स्टाफ येथे जावून नमुद आरोपीचा शोध घेतला असता, तो मिळून आला. त्यास सखोल विचारपुस केली असता, त्याने नमुद गुन्ह केला असल्याचे कबूल केले व त्याचे ताब्यात होन्डा सि.बि. शाईन कंपनीची मोटार सायकल वाहन क्र. MH 49-AC 5296 ही मिळून आली. वरून नमुद आरोपीस सदर गुन्हयांत अटक करण्यात आली व न्यायालयात पेश करण्यात आले. पुढील तपास पो.हवा / २५३२ जावेद सिद्दीकी हे करीत आहे.
सदर कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. निशिकांत रामटेके चंद्रपूर शहर, सपोनी राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलटे, पोउपनि विलास निकोडे, पोहवा. लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, मपोहवा. भावना रामटेके, नापोअं. कपुरचंद खरवार, पो.अं. रूपेश पराते, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, मपोअं. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे.
0 Comments