स्व. कालीदास अहीर जयंतीदिनी 12 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

 







स्व. कालीदास अहीर जयंतीदिनी 12 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : कमल स्पोर्टींग क्लब या सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राला वाहून घेणाऱ्या प्रतिथयश संस्थेचे संस्थापक व युवकांच्या प्रगतीकरिता धडपडणारे नेतृत्व स्व. कालिदास गं. अहीर यांच्या जयंती स्मृतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

                राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर  यांच्या प्रेरक मार्गदर्शनात कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या विशेष पुढाकाराने अहीर परिवार व मित्र मंडळींच्या वतीने चंद्रपूर येथील जैन भवन सभागृह, पठाणपुरा रोड, चंद्रपूर येथे सकाळी 09.00 वाजेपासून होत असलेल्या या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर, तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती लाभणार आहे.

                सदर रक्तदान शिबिर चंद्रपूर मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. कांबळे, सामान्य रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. चिंचोले, डॉ. राजु सैनानी, डॉ. एम.जे. खान, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, लाईफलाईन रक्तपेढी नागपुरचे डॉ. वरभे, मधुसूदन रूंगठा, दामोदर मंत्री व शहरातील अनेक मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. तरी या रक्तदान शिबीरास भाजप, भाजयुमो, ओबीसी मोर्चा व शहरातील युवक, युवतींनी बहुसंख्येने उपस्थित राहून रक्तदानासारख्या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे आवाहन कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments