बल्लारपूर तालुक्यातील मौजा-इटोली, किन्ही व दहेली येथे पांदण रस्त्याचे दूतर्फा वृक्षरोपन कार्यक्रम; "आईच्या नावे, एक झाड "
बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी "आईच्या नावे, एक झाड " या संकल्पनेतून बल्लारपूर तालुक्यातील मौजा- इटोली, कीन्ही व दहेली येथे समबंधीत ग्राम पंचायतीचे सरपंच, पदाधिकारी, स्थानिक नागरीक यांचे उपस्थितीत रोहयो अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या पांदण रस्त्याचे दुतर्फा जागेमध्ये महसूल प्रशासनाचे वतीने वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी " आईचे नावे, एक झाड " या संकल्पनेतून वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाचा समतोल राखता येऊ शकतो, असे प्रतिपादन श्रीमती.रेणुका कोकाटे तहसीलदार बल्लारपूर यांनी या प्रसंगी मत व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे सफलते करीता नायब तहसिलदार सर्व श्री.महेंद्र फुलझेले, अजय मलेलवार तसेच, मंडळ अधिकारी सर्व श्री.किशोर नवले, सुजित चौधरी ग्राम महसूल अधिकारी, सर्वश्री. कमलवार, झाडे, चांदेकर, निंबाळकर, अकोजवार, कु.दुलत, कु.मडावी तसेच, सहायक महसूल अधिकारी सर्व श्री.दीपक वडूळे, सुनील तुंगीडवार, अजय देवतळे, कु.निलम नगराळे, कोतवाल सर्व श्री.राऊत, वेटे, वाटगुळे, वाहन चालक श्री.कचरु गेडाम व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
0 Comments