आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बदनामीचा प्रयत्न

 








आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बदनामीचा प्रयत्न

◾मौजा वडगांव विभागातील नागरिकांची फसवणूक झाली नाही

◾पत्रकार परिषदेत रवी लोणकर यांची माहिती

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : येणाऱ्या  स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मौजा चंद्रपूरच्या वडगाव विभागातील जमीन विक्रीपत्राद्वारे खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे वडगाव विभागातील लोकांची फसवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही रवी लोणकर यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, वडगाव प्रभागातील सर्व्हे क्रमांक ८१/१ आणि ८१/२ मधील एकूण १.८७ हेक्टर क्षेत्रफळांपैकी ०.८० हेक्टर शेती जमीन रवी लोणकर यांनी २५ जानेवारी २०१६ रोजी अविनाश बाजीराव खोकले, बिपिनचंद्र जथुलाल मेहता आणि अजीद अहमद अहमद अहमद हुसेन यांच्याकडून विक्रीपत्राद्वारे खरेदी केली होती. याआधी सदर भूखंड खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. 

या संदर्भात २९ डिसेंबर २०१५ रोजी अ‍ॅड. महेंद्र विश्रोजवार यांच्यामार्फत एक सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिद्ध केलेल्या सूचनेनंतर ७ दिवसांच्या आत हरकती घेणे आवश्यक होते. परंतु कोणताही आक्षेप किंवा उत्तर न मिळाल्याने, २५ जानेवारी २०१६ रोजी संबंधित जमीन विकण्यात आली. भूखंड विक्रीनंतर, जमिनीत फेरफार करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करण्यात आला. त्यानंतर महसूल कायद्यांतर्गत संबंधित नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर मनोहर पाऊणकर आणि इतर १० जणांनी सदर फेरफाराला आक्षेप नोंदवला. त्यामुळे, मंडळ अधिकाऱ्यांनी  ही बाब तहसीलदारांकडे पाठवली. तहसीलदारांनी तलाठ्यांकडून अहवाल मागितला. तलाठ्यांनी अहवाल सादर केल्यानंतर, तहसीलदारांनी २० ऑगस्ट २०१६ रोजी आदेश दिला की सदर भूखंडातील ०.६५ हेक्टर जमिनीत फेरफार करण्यास कोणताही आक्षेप नाही. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशावर उपविभागीय अधिकाऱ्याकडे  महसूल अपील दाखल करण्यात आले. तेथे ही, आक्षेप घेणा_यांनी त्यांचा आक्षेप नोंदवला. तेव्हा, उपविभागीय अधिकाऱ्याने  अपील निकाली काढले आणि असा आदेश दिला की उपलब्ध क्षेत्रफळ फक्त ०.६५ हेक्टर आहे आणि इतकेच क्षेत्रफळ असल्याने, त्याच क्षेत्राचा फेरफार घेण्याचा आदेश देण्यात आला.

परिसरातील संबंधित लोकांनी जिल्हाधिकारी कडे अपील दाखल करून उपविभागीय  अधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिले आणि २४ एप्रिल २०१८ रोजी स्थगिती आदेश मिळवला. त्या आदेशावर लोणकर यांनी नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसमोर पुनर्विलोकन प्रकरणाला आव्हान दिले.  अधिकाऱ्यांनी २४ एप्रिल २०१८ रोजी दिलेला स्थगिती आदेश रद्द केला आणि अतिरिक्त अधिकाऱ्याना 3 महिन्यांत सदर अपील निकाली काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, अतिरिक्त जिल्हा  दंडाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी सदर अपीलात आदेश दिला आणि अपीलकर्त्याचे अपील फेटाळले. अशा परिस्थितीत, रवी लोणकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोटी आणि बनावट माहिती देऊन वासाडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला आहे.




Post a Comment

0 Comments