अजय कंकडालवार यांची प्रदेश कॉंग्रेस महासचिवपदावर नियुक्ती : मित्र परिवाराकडून पुष्पगुच्छ देवून सत्कार...!

 








अजय कंकडालवार यांची प्रदेश कॉंग्रेस महासचिवपदावर नियुक्ती : मित्र परिवाराकडून पुष्पगुच्छ देवून सत्कार...!


अहेरी,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अज्जू पठाण व मित्र परिवाराकडून अजय कंकडालवार यांच्या कार्यालयात जावून त्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
अहेरी परिसरातील गोगरीब, अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी अजय कंकडालवार हे नेहमीच मदतीला धावून जातात.त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असतात.अजय कंकडालवार यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती झाल्याने कार्यकर्ते, नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
यावेळी आलापल्लीतील काँग्रेस कार्यकर्ता माजी सरपंच अज्जू पठाण,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष रज्जाक पठाण,सामाजिक कार्यकर्ता प्रशांत सरकाटे, हाजी सय्यद सोनू, हाजी फिरोज कुरेशी, सामाजिक कार्यकर्ता शोभन संड्रावार उपस्थित होते.सर्वांनी अजय कंकडालवार यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments