बल्लारपुर शहरातील गोल पुलिया रस्ता सुरळीत करावा; शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर





बल्लारपुर शहरातील गोल पुलिया रस्ता सुरळीत करावा; शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर Ballarpur 

बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दि .२९/०८/२०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस कामेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली वस्ती जानारे मार्ग गोल पुलिया रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना आणि वाहनचालकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषद बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गोल पूलिया विस्तारीकरण चा कार्य रेल्वे विभागा कडुन मागील सहा महिन्यापासून सुरु आहे. या कार्यांमुळे गोल पुलिया मधून ये-जा करणारे लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. 

या संबंधात अनेक वेळा नागरिकांनी तकरार करून सुध्दा रेल्वे विभागातर्फे बांधकामात दिरंगाई दिसुन येत आहे.

गणेशोत्सव दरम्यान या मार्गावर नागरिकांची आवाजाही वाढली असून रेल्वे विभागातर्फे गोल पूलिया च्या एका बाजूने बांधकामाच्या नावावर अर्धा रास्ता  अडवून ठेवल्यामूळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना त्रास होत आहे.

आपल्या मार्फत रेल्वे विभाग, महसूल विभाग तमेच पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक लावून या समस्येवर कायमस्वरूपीं तोडगा काढण्यात यावा ही विनंती.

निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्षा छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, आनंद कटारे, नरसिंह रेब्बावर, लखपती घुगलोत यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments