भटाळी येथील कावेरी सी 5 कंपनीकडून कामगारांवर अन्याय;नियमानुसार वेतन देत नसल्याचा आरोप






भटाळी येथील कावेरी सी 5 कंपनीकडून कामगारांवर अन्याय;नियमानुसार वेतन देत नसल्याचा आरोप

◾कामगारांना न्याय न मिळाल्यास कामगार कार्यालयाला ठोकणार टाळे 

पत्रपरिषदेत शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख गिर्हे चा इशारा 

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : भटाळी येथील कावेरी सी 5 कंपनीत काम करणा_या 300 हून अधिक कामगारांना नियमानुसार वेतन देत नसल्याचा आणि पीएफ रक्कम भरत नसल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय केला जात आहे. या संदर्भात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम देत कामगार आयुक्त कार्यालयाला शिवसेना स्टाईल मध्ये टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

भटाळी येथील कावेरी सी 5 कंपनी गेल्या 2 वर्षांपासून भटाळी ओपन कास्टमध्ये काम करत आहे. या कंपनीत 300 ते 350 कामगार काम करतात. त्यापैकी काही ड्रायव्हर, सुपरवायझर, क्लीनर आणि काही मदतनीस आहेत. परंतु यापैकी कोणत्याही कामगारांना नियमानुसार वेतन दिल्या जात नाही आहे. त्यांचा पीएफ ही कापला जात नाही आहे. 

नियमानुसार या कामगारांना 1305 रूपए रोजी मिळायला हवी. परंतु कंपनी या कामगारांना फक्त १२ हजार रुपये देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे. या संदर्भात कंपनीच्या कामगारांनी 7 जून रोजी कंपनीचे काम थांबवून कंपनीसमोर निदर्शने केली होती. हे निदर्शन ८ दिवस चालले. निदर्शनादरम्यान कामगारांनी कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापनावर त्यांची भेट न घेतल्याचा आरोप केला. कामगार आयुक्तांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने कंपनीशी चर्चा केली आणि पगार वाढवण्याचे तोंडी आश्वासन दिले, परंतु आतापर्यंत कामगारांना नियमांनुसार पगार दिला जात नाही. या संदर्भात केंद्रीय कामगार कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. परंतु कामगार कार्यालयाचे अधिकारी टाळाटाळ करणारे उत्तरे देत आहेत. पत्रकार परिषदेत संदीप गिर्हे यांनी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचे निराकरण ७ दिवसांत न झाल्यास शिवसेना कामगार कार्यालयाला टाळे ठोकेल असे संकेत दिले आहेत.

शिवसेना उभा जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, सुरेश पचारे आणि इतर कामगार पत्रकार परिषदेत उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments