14 ते 17 ऑगस्ट पर्यंत नोंदणी कार्यालयातील सेवा तीन दिवस बंद
◾सर्व्हरची दुरुस्ती करण्याचे नियोजन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दस्त नोंदणीसाठी करण्यात येणाऱ्या सर्व्हरच्या नियमित देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आज, गुरुवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत तीन दिवस दस्त नोंदणी बंद राहणार आहे. शुक्रवार ते रविवार या तीन दिवस सुट्ट्या असल्याने देखभाल दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी सांगितले.
राज्यात दस्त नोंदणी करण्यासाठी सध्या '१.९ आय सरिता' संगणक प्रणाली वापरली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात सव्र्व्हरवर ताण येतो. हा ताण दूर करणे; तसेच त्यातील अडथळे दूर करण्यासाठी देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रणाली अंतर्गत दस्त नोंदणीसह अन्य सेवाही बंद राहणार आहेत. याची पक्षकारासह दस्त नोंदणी करणाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आल्यामुळे 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजतापासून 17 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील. तरी संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी कळविले आहे.
0 Comments