Homeopathic Doctors होमिओपॅथिक डॉक्टरांचे १६ पासून आंदोलनाचे संकेत

 





Homeopathic Doctors होमिओपॅथिक डॉक्टरांचे १६ पासून आंदोलनाचे संकेत

◾सीसीएमपी मध्ये नोंदणीची मागणी

◾अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोगी यांची पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमए होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सीसीएमपी नोंदणीला विरोध करत आहे. होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोगी यांनी पत्रकार परिषदेद्वारे जिल्हा प्रशासनाकडे सीसीएमपी मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर १६ जुलै पासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आणि राज्य सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचे संकेत होमिओपॅथिक डॉक्टरांनी दिले आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक औषधोपचार करण्याची परवानगी देणे लोकांचे आरोग्य आणि रुग्णांचे जीवन धोक्यात आणू शकते. अशा गैरसमजाच्या आधारे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला या व्यावसायिकांना नोंदणी देणे बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, दोन्ही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करण्यासाठी आणि सरकारला व्यापक अहवाल सादर करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. तथापि, या समितीने दोन महिन्यांच्या आत सरकारला आपला अहवाल सादर करावा. आणि मेडिकल कौन्सिल ने होमिओपॅथिक व्यवसायांसाठी नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी आणि सीसीएमपी उत्तीर्ण झालेल्या व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली. 

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने आयएमएच्या दिशाभूल करणा_या दबावाला बळी न पडता कायद्याच्या तरतुदीनुसार १० हजारांहून अधिक सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करावी अशी विनंती होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखेच्या वतीने डॉ. नंदकिशोर जोगी यांनी कौन्सिल ला केली आहे. 

पत्रपरिषदेला डॉ. गोखरे, डॉ. गौरकर, डॉ. जोगी, डॉ. मिलिंद दाभेरे, डॉ. आनंद फुलझेले, डॉ. सुरेंद्र बत्तुलवार, डॉ. वाघ, डॉ. पंकज लोंगागडगे, डॉ. अवनीश परासर, डॉ. विजय मासिरकर, डॉ. अभिजीत सोनवणे, डॉ. सिराज खान, डॉ. सत्यजित पोद्दार इत्यादी पत्र परिषदेत उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments