आज बार असोसीएशन चे एकदिवसीय बंद आंदोलन

 






आज बार असोसीएशन चे एक दिवसीय बंद आंदोलन

◾चंद्रपुर रेस्टारंट एन्ड बार असो. अध्यक्ष अरविंद सिंह भाटिया याची माहीती

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र सरकारने परमीट रूम, अबकारी शुल्कात वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्हयातील रेस्टारंट एन्ड बार असोसिएशनद्वारा सोमवारी  (दि.14) एक दिवसीय बार बंद आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा बार अॅन्ड रेस्टॉरन्ट असोशीएशचे अध्यक्ष अरविंदसिंह भाटीया यांनी पत्रकार परीषदेत दिली.

संपुर्ण महाराष्ट्रात जवळपास 19 हजार परमीट रुम / बार आहेत. गेल्या काही वर्षापासुन या व्यवसायाला सरकारच्या धोरणामुळे खुप मोठा प्रमाणात फटका बसत आहे. फक्त परमीट रुम वर लावलेला 10% व्हॅट, या वर्षी 15% फी वाढ आणि आता शासनाद्वारे अबकारी शुल्कात दिड पट केल्याने व्यवसायाचे फार मोठे नुकसान होणार आहे. येणा_या काळात संपूर्ण जिल्हयातील बारमध्ये विक्री 50 % पेक्षा घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जवळपास 650 एवढे बार अॅन्ड रेस्टॉरंट असून विक्री कमी झाल्यास जवळपास 25% पेक्षा जास्त बार बंद पडणार. बारमध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांना रोजगार मिळतो. तो रोजगार हिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनामार्फत करण्यात येणारी टॅक्स वाढ तात्काळ थांबविण्यात यावी. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकदिवसीय बार बंद आंदोलन करण्यात येत आहे. 




Post a Comment

0 Comments