अल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी गजाआड चोरीचे ५ गुन्हे उघड
◾तीन आरोपी अटक;५,३३,०६०/- रु. चा मुद्दामाल जप्त
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १४/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक पेट्रोलीग करीत असतांना मिळालेल्या पडोली परिसरात सापळा रचुन आरोपी नामे (१) देवेंद्र उर्फ गोलु महादेव गेडाम वय २५ वर्ष रा. वार्ड नं.४ दुर्गापूर (२) पवन कॉग्रेस दुर्गे, वय २९ वर्ष रा. कोयना गेट, चिनाळा, (३) विष्णुदेव भिमराव नैताम वय २२ वर्ष रा. डोनी ता. मुल यांना ताब्यात घेवुन पंचसमक्ष त्याच्या ताब्यातील पिकअपर वाहनाची तपासणी केली असता त्यात १६७ किलो अल्युमिनियम तार, किं. ३०,०६०/- रु., ग्राईडर मशीन किं. ३०००/- रुपये किंमतीचे मिळुन आल्याने त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी -
१) पोलीस स्टेशन पडोली अप.क. २३२/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३
२) पोलीस स्टेशन कोठारी अप.क्र.४२/२०२५ कलम १३६ भारतीय विद्युत अधिनियम २००३
३) पोलीस स्टेशन कोठारी अप.क्र.४४/२०२५ कलम १३६ भारतीय विद्युत अधिनियम २००३
४) पोलीस स्टेशन मुल अप.क. २२८/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३
५) पोलीस स्टेशन मुल अप.क्र. २३२/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३
अशा ५ चोरीचे गुन्हे केले असुन सदर चोरीच्या गुन्हयातील सदर अल्युमिनियम तार असुन ते विक्री करीता नेत असल्याचे सांगितल्याने सदर चोरीचा माल आणि गुन्हयात वापरलेली पिकअप वाहन असा एकुण ५,३३,०६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी पडोली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निभोरकर, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ/२०४० धनराज करकाडे, पोहवा/८११ नितीन कुरेकार, पोहवा /२५४ नितीन साळवे, पोहवा /१२२७ चेतन गज्जलवार, पोहवा /१४४६ सचिन गुरनुले, पोहवा /१४५ सुरेद्र महतो, पोहवा/२२९६ रजनीकांत पुट्टावार, पोहवा/८१४ सुभाष गौरकार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, पोहवा/२५४२ इमरान खान, पोअं/६२० मिलींद जांभुळे, पोअं/८८७ प्रफुल्ल गारघाटे, पोअं/१२४७ शशांक बदामवार, पोअं/१२३९ किशोर वाकाटे, पोअं/८२५ हिरालाल गुप्ता, चापोअं /६०६६ मिलीट टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर टिम यांनी केली आहे.
0 Comments