Election Department
निवडणूक विभाग व निर्वाचक गणाचे प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द
◾जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - 2025
◾प्रारुप प्रभाग रचनेवर 21 जुलै पर्यंत हरकती व सुचना आमंत्रित
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग बाबतीत निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे. त्यानुसार जि.प. निवडणूक विभाग 56 व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारूप परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) मधील अधिसूचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात, 14 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयील सूचना फलक / संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना 21 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी /संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
अशी आहे जिल्ह्यातील निवडायची सदस्य संख्या : सन 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या 14 लक्ष 23 हजार 349 आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लक्ष 98 हजार 28 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3 लक्ष 18 हजार 373 अशी आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग 56 व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 निश्चित करण्यात आली आहे. यात चिमूर (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या - 10), नागभीड (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), ब्रम्हपुरी (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या - 10), सिंदेवाही (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), भद्रावती (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), वरोरा (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या - 10), चंद्रपूर (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या - 10), मूल (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या - 6), सावली (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), पोंभुर्णा (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या - 4), गोंडपिपरी (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या - 6), बल्लारपूर (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या - 4), कोरपना (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), जिवती (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या - 4) आणि राजूरा (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8) अशी आहे.
0 Comments