सोन्या-चांदीचे दागीने एकुण किं. १,५४,०००/- रु.चा माल जप्त; आरोपी अटक
◾रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अटक; पोलीस स्टेशन रामनगर ची कामगिरी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १३/०७/२०२५ रोजी रात्रौ दरम्यान पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे शोध पथक पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून रयतवारी कॉलरी परिसरात रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे मो. सरफोराज सागीर शहा उर्फ शुटर वय २४ वर्ष रा. आमटे ले-आऊट रयतवारी कॉलरी चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने पोलीस स्टेशन रामनगर येथील दि.७/७/२०२५ ते ९/७/२०२५ दरम्यान घडलेला अपराध क्रमांक ५२७/२०२५ कलम ३३१ (१), ३३१ (४), ३०५ भारतीय न्याय संहिता हा घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे कब्ज्यातुन सदर गुन्हयातील चोरलेले सोन्या-चांदीचे दागीने किंमत १,५४,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचे नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोअं. शरद कुडे, आनंद खरात, लालु यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेन्द्रे, जितेंद्र आकरे, बाबा नैताम, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, सुरेश कोरेवार, ब्ल्युटी साखरे सर्व पोलीस स्टेशन रामनगर यांनी केली आहे.
0 Comments