भरारी पथक पोलीस असल्याची खोटी बतावणी करुन खंडणी वसुल करणारी तोतया टोळी जेरबंद; ३ खंडणीबाज अटक

 






भरारी पथक पोलीस असल्याची खोटी बतावणी करुन खंडणी वसुल करणारी तोतया टोळी जेरबंद; ३ खंडणीबाज अटक

 ◾एकुण १३,१०,०००/- रु. चा माल जप्त पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : भरारी पथक पोलीस असल्याची खोटी बतावणी करुन खंडणी वसुल करणारी तोतया टोळी जेरबंद करण्यात यश मुल पोलीस स्टेशन त्याचेविरुध्द कारवाई केली. 

यातील आरोपी क्र. (१) बादल दुर्गाप्रसाद दुबे वय ३६ वर्ष, (२) सौ. संगिता बादल दुबे वय २७ वर्ष दोन्ही रा. रेंगेपार ता. साकोली जि. भंडारा (३) अजय विजय उईके वय ३१ वर्ष रा. गजानन मंदीर रोड शितला माता मंदीरच्या मागे चंद्रपूर (४) देवेंद्र चरणदास सोनवणे वय ३० वर्ष रा. निलज ता. साकोली जि. भंडारा ह.मु. भिवापूर वार्ड चंद्रपूर यांनी संगनमत करून दिनांक ३ जूलै, २०२५ रोजी फिर्यादी नामे सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३६ वर्ष रा. चिरोली यांचे घरी एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार क. MH34-CJ-5824 नी जावुन त्यांना पोलीस भरारी पथक चंद्रपूर असल्याची बतावणी करुन त्यांचे घरी मिळुन आलेल्या विनापरवाना दारु वर कार्यवाही करण्याचे धाक दाखवुन त्यास १५,०००/- रुपयाची मागणी करुन तडजोड अंती १०,०००/- रु.ची खंडणी वसुल केले.

आणि  मौजा डोंगरगांव येथील नामे एजाज शेख ईब्राहीम शेख याचे अंडा-आमलेट दुकानात जावुन दुकानात दारु पिणारे व्यक्ती मिळुन आल्याने त्याचेविरुध्द कारवाई करण्याचे धाक दाखवुन त्यास १०,०००/- रु.ची खंडणीची मागणी करुन तडजोड अंती ५०००/- रु. खंडणी वसुल केले अशा फिर्यादीने दिनांक १३ जुलै, २०२५ रोजी दिलेल्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक २५३/२०२५ कलम ३०८ (२), २०४, ३(५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हयाचे तपासात, मुल पोलीसांनी आरोपी निष्पन्न करुन वरील नमुद आरोपी पैकी आरोपी क्रमांक १ ते ३ यांना अटक करुन त्यांचेकडुन (१) एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार क. MH34-CJ-5824 किं. १२,५०,०००/- रु. (२) दोन नग विवो कंपनीचे आणि एक नग ओपो कंपनीचा मोबाईल किं. ४५,०००/- रु. (३) रोख १५,०००/- असा एकुण १३,१०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मुल चे ठाणेदार पो.नि. विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोहवा /२४० जमीर खान पठाण, पोहवा/२३९७ भोजराज मुंडरे, नापोअं/२४९७ चिमाजी देवकते, पोअं/१८३ नरेश कोडापे, पोअं/१२३२ शंकर बोरसरे, पोअं/१३० संदिप चुधरी सर्व पोलीस स्टेशन मुल यांनी केली आहे.

नागरीकांना आवाहन -

अशा प्रकारच्या खंडणीबाज तोतया बनावट पोलीसांच्या धमकी ला बळी पळु नका, अशा प्रकारे कोणीही खंडणीची मागणी केल्यास तात्काळ जवळील पोलीस स्टेशन ला किंवा पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील ११२ वर कॉल करुन माहिती दया, पोलीसांना सहकार्य करा.




Post a Comment

0 Comments