बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक फौजदार विनायक धुर्वे यांचे निधन Ballarpur Police Station
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक फौजदार विनायक धुर्वे यांचे रात्री निधन झाले आहे. ते ५४ वर्षाचे होते.
सफौ विनायक धुर्वे यांच्यावर मागील एक महिन्यापासून नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना बीपी, सुगर चा त्रास होता.
तसेच त्यांचे किडनी निकामी झाले होते. त्यांना डायलिसिस वर ठेवण्यात आले होते. त्यांना किडनी प्रत्यरोपण करणार होते. पण त्यांची प्रकृती खालावल्याने प्रत्यरोपन झाले नाही. अश्यातच रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन झाले. त्यांना मागील महिन्यात सहाय्यक फौजदार म्हणून पदोन्नती मिळाली होती.
सफौ विनायक धुर्वे पोलीस विभागात ३४ वर्ष सेवा केली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व आप्तपरिवार आहे.
0 Comments