समाजधुरीणांनी कर्तव्य भावनेतून समाजाची उन्नती साधावी - हंसराज अहीर

 






समाजधुरीणांनी कर्तव्य भावनेतून समाजाची उन्नती साधावी  - हंसराज अहीर

◾हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांनी सामाजिक उन्नतीसाठी   संविधानाने बहाल केलेल्या न्याय अधिकारांचा वापर सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व आर्थिक प्रगतीसाठी करावा हीच खऱ्या अर्थाने सामाजिक ऋणाची परतफेड ठरेल. विद्यार्थ्यांनी  सुध्दा अभ्यासाबरोबरच मन, बुध्दी आणि शरीर स्वास्थ्य अबाधित ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे जीवन घडवावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

            वर्धा जिल्हा महाराष्ट्र गवळी समाज संघटना, युवा आघाडी, महिला आघाडी व विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून दि. 13 जुलै 2025 रोजी वर्धा येथे आयोजित गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात हंसराज अहीर यांनी गवळी समाज संघटनेतील राज्यभरातील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी समाजाला विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविता यावा याकरिता मार्गदर्शकाची भुमिका बजावण्याकरिता पुढाकार घ्यावा असेही अहीर म्हणाले.

            गवळी समाजाचा दुग्ध व्यवसाय हा पारंपारीक व्यवसाय असला तरी या व्यवसायाला पुरक ठरणारे अन्य व्यवसाय स्वीकारून समाजाने आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी असे सांगून ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे कार्य संविधानास अनुरूप असल्याने संवैधानिक मार्गाने अखिल समाजाची प्रगती व सदृढ लोकशाही करीता केंद्र व राज्य सरकारने सामाजिक न्यायाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या असल्याने गवळी समाजातील बांधवांनी, विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेवून प्रगती साधावी असे आवाहनही अहीर यांनी केले.

            या प्रसंगी हंसराज अहीर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज बांधवांनाही गौरविण्यात आले. या गुणगौरव सोहळ्यास समाजाचे प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, बाबासाहेब गलाट, गोपालराव अवथळे, उध्दव गाडेकर, प्रदेश सचिव अशोक मंडले, वैशाली अवथळे, आनंद कालोकर, सुरेंद्र हुंडीवाले, उत्तम काळे, सदाशिव खडके, दिपक खताळे, देवेंद्र धोबडे, अश्विनी गलाट यांचेसह समाज बांधव बहुसंख्यने उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश अवथळे, सचिव मोरेश्वर गलाट व पदाधिकाऱ्यांनी विेशेष परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments