बल्लारपूर तालुक्यात दि.1 ऑगस्ट पासून 7 दिवस महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन









बल्लारपूर तालुक्यात दि.1 ऑगस्ट पासून 7 दिवस महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

विडीओ 
श्रीमती.रेणुका कोकाटे तहसिलदार, बल्लारपूर

बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महसूल विभाग हा शासनाचा कणा असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम राबविण्यासाठी सदैव अग्रेसर असतो. दि.01 ऑगस्ट,2025 " महसूल दिन " असून सम्पूर्ण राज्यात महसूल दिन निमित्त महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. शासन निर्देशानुसार बल्लारपूर तालुक्यामध्ये खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी कार्यक्रम/ शिबिरात  सहभागी होऊन जास्तीत-लाभ घेण्यासाठी तालुका प्रशासनाचे वतीने श्रीमती.रेणुका कोकाटे तहसिलदार, बल्लारपूर यांनी आवाहन केले आहे.

महसूल सप्ताह :-

दि.1 ऑगस्ट,2025 :-  महसूल दिन साजरा करणे, महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ.

दि.2 ऑगस्ट,2025 :-  शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ पात्र अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम.

दि.3 ऑगस्ट,2025 :-  सीमांकीत पांदण रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे.

दि.4 ऑगस्ट,2025 :- बल्लारपूर व कोठारी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविणे.

दि.5 ऑगस्ट,2025 :- केंद्र व राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न-झालेल्या लाभार्थ्यांच्या घरोघरी भेटी देणे व   सहाय्य करणे.

दि.6 ऑगस्ट,2025 :- शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशीत करणे व शर्थभंग प्रकरणात शासन धोरणानुसार निर्णय घेणे.

दि.7 ऑगस्ट,2025 :- M-Sand धोरणाची अमलबजावणी करणे व नवीन मानक SOP प्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजन करणे.
नागरिकांनी कार्यक्रम/ शिबिरात  सहभागी होऊन जास्तीत-लाभ घेण्यासाठी तालुका प्रशासनाचे वतीने श्रीमती.रेणुका कोकाटे तहसिलदार, बल्लारपूर यांनी आवाहन केले आहे.



Post a Comment

0 Comments