मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर सेवानिवृत्त झालेल्या पर्यवेक्षिका रच्चावार मॅडम यांचा गौरव पूर्ण सत्कार
◾शाळेचे संस्थापक माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी विमल मॅडम यांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे सेवानिवृत्त झालेल्या पर्यवेक्षिका श्रीमती विमल रच्चावार मॅडम यांचा गौरव पूर्ण सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यांच्या 35 वर्षाच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करताना शाळेतील प्राचार्या,शिक्षक व विद्यार्थी भावूक झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. असमा खान खलीदी मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या शाळेचे संस्थापक माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली असून सत्कारमूर्ती श्रीमती. विमल रच्चावार मॅडम यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
त्यांची शैक्षणिक वाटचाल आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम याचा आढावा घेणारे प्रसंग म्हणजे विज्ञान प्रदर्शनी साठी केलेले प्रयत्न तसेच शाळेच्या भविष्यासाठी विचार करणारा या शब्दात सांगताना शाळेच्या प्राचार्या असमा मॅडम भावनिक झाल्या. शाळेचे संस्थापक जैनुद्दीन जव्हेरी सर यांनी विमल मॅडम यांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच हर्षा मॅडम,अली मॅडम,वनिता मॅडम, मोझरीया मॅडम त्याचबरोबर विद्यार्थिनींनी सुद्धा सत्कारमूर्ती विमल मॅडम बद्दल विचार व्यक्त केले. सत्कारमूर्ती श्रीमती. विमल मॅडम यांनी निरोप घेताना त्या भावूक झाल्या तसेच शाळेला मी सर्व चांगलं देण्याचे कार्य केले असे सांगून त्यांनी एक कविता म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कांबळे मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संतोष काकडे सर यांनी केले. हा निरोप समारंभ शिक्षकांच्या समर्पित सेवेचा सन्मान करत शिक्षक विद्यार्थी नात्याचा अनोखा अविष्कार ठरला.
0 Comments