एनडीए साठी स्पंदन रोहणकरची निवड - पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार!

 



एनडीए साठी स्पंदन रोहणकरची निवड - पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार! 

◾उच्च शिक्षण घेऊन देश सेवा करण्याचा स्पंदन चा निर्धार


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज  ) : चंद्रपूर येथील स्पंदन रोहणकर यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणार्‍या एनडीए मध्ये एअस फोर्स प्लाईंग ऑफीसर या पदासाठी निवड झाली असून राष्ट्रीय स्तरवर त्यांनी २५५ व्या स्थानावर झेप घेत त्याबद्दल विविध स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्पंदनची एनडीए साठी निवड झाली तेव्हापासून औरंगाबाद,नागपूर,चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात अनेक संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्पदंनने एनडीए मध्ये भरारी घेवून चंद्रपूर जिल्ह्यात नाही तर विदर्भाच नाव राष्ट्रीय स्तरावर  पोहचविले आहे. त्याबद्दल आ.करण देवतळे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी  विकास मंत्री ना. डॉ.अशोक उईके यांनी चंद्रपूरला आले असता सीडीसीसी बँकेच्या सभागृहात सन्माचिन्ह व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला व पुढील वाढचालीसाठी  शुभेच्छा दिल्या. 

स्पंदनने १ ली ते ८ वी पर्यंत चांदा पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेतले. ९ व १० मध्ये सैनिकी स्कुल बल्लारशाह आणि ११ वी १२वी एसपीआय औरंगबाद येथून भरघोष गुण मिळवून यश संपादन केले.११ वी आणि १२ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर २५५ व्या स्थानी बाजी मारली. 

स्पंदनचे वडील विजय रोहणकर हे प्राध्यापक असून आई एका वैशाली वृत्तपत्राची  संपादक आहे. तर आजोबा डी.के.आरीकर हे प्रसिध्द समाजसेवक आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आजी आजोबाला,आई वडील व प्राध्यापक,शिक्षक यांना दिले आहे. त्यांनी देशाची व समाजाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्पंदनला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.




Post a Comment

0 Comments