बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावर देवेंद्र आर्य यांची नियुक्ती.
बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार चंद्रपूर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी माजी गटनेते देवेंद्र सत्यदेव आर्य यांना बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
देवेंद्र आर्य यांनी आपल्या या पदावर नियुकी केल्याने त्यांनी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे , माजी विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, रजनी हजारे आणि माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांचे आभार मानले.
देवेंद्र आर्य यांच्या नियुक्ती वर माजी शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी,मधुकर बावने,दिलीप माकोड़े,सुनंदा आत्राम ,तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद, चंद्रपूर जिल्हा परिवहन अध्यक्ष नरेश मुंदडा, बल्लारपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश आनंद, भास्कर माकोडे ,डॉ. सुनील कुलदीवार,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई,बल्लू सेठ गिदवानी,चेतन गेडाम, जयकिरण बजगोती, इस्माईल ढाकवाला, नाना बुंदेल,दौलत बुंदेल,मंगेश बावने,नरसिंह रेब्बावार,आनंद विरय्या,प्राणेश अमराज,चंदा बुंदेल,मीना बहुरिया, रवी मातंगी,आनंद अंबाला,डेविड कामपेल्ली,दीपक धोपटे, सुरेश बोपणवार यांनी अभिनंदन केले.
0 Comments