महावितरणचे लाखोंचे नुकसान


महावितरणचे लाखोंचे नुकसान

◾वादळाचा जबर तडाखा, झाडे कोसळली, पत्रे हवेत उडाली; विदयूत खांब वाकले, विदयूततारा तुटल्या




चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 16/06/2025 चंद्रपूर जिल्हयात दि. 09/06/2025 व 10/06/2025 सलग दोन दिवस आलेल्या पावसाने, वारा, वादळाने जनजीवन प्रभावीत झाले. चंद्रपुरातील अनेक गावात/शहरात वारा, वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला. दोन दिवस झालेल्या पावसाने वारा, वादळाने चंद्रपुर जिल्हयातील व ग्रामीण भागातील मोठे झाडे लाईनवर पडल्याने महावितरणचे एच.टी. पोल 165, एल.टी. पोल 547, एच.टी. लाईन कंडक्टर 20 किमी. पर्यंत तुटले, एल.टी. लाईन कंडक्टर 42 किमी. पर्यंत तुटले. एकूण 35 रोहित्रे बंद पडले. एकंदरीत महावितरणचे 63 लाखाच्या जवळपास नुकसान झाले. पाऊस, वारा, वादळ यामुळे शहरातील/गावातील दोन दिवस झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महावितरणचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. 

अशा ही परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी अनेक चंद्रपूर शहरातील/गावातील खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला 33 के.व्ही. विद्युत वाहिनीवर वादळी वाऱ्यामुळे मोठे झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहिनीवर अहोरात्र/रात्रंदिवस काम करून विद्युत वाहिनी सुरू केली. वरील दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता ठिकठिकाणी युद्ध पातळीवर महावितरणचे जनमित्र काम करीत होते.




Post a Comment

0 Comments