प्रतिबंधित बीटी बियाणे वाहतुक करणारे इसमांविरुध्द गुन्हा दाखल,एकुण १३,५०,०००/- रुपयाचा मुद्दा माल जप्त
◾स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोलीस ठाणे बल्लारपूर ची संयुक्त कारवाई
◾आरोपी नामे इमरान खान नासीर खान वय ३७ वर्ष रा. बगड खिडकी वार्ड, चंद्रपूर आणि माल मालक नामे सुमित नगराळे रा.आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांचेविरुध्द पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध दर्ज
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १४ जुन, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक पोलीस ठाणे बल्लारपूर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस ठाणे बल्लारपूर चे पथकासह विसापूर-बल्लारपूर रोड वर सापळा रचुन चाचाकी वाहन टाटा एस क्र. MH40-AB-2356 ला थांबवुन सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात एकुण ८०० नग पॉकेट चोर बीटी पुष्पा ५जी संशोधित हायब्रीड कापूस बियाणे प्रति पॉकेट किंमत १५००/- रु. प्रमाणे एकुण १२,००,०००/- रुपयाचा माल अवैध रित्या मिळुन आल्याने सदर बियाणांची पडताळणी व कारवाई करणेसाठी कृषी विभागाला माहिती देवुन कृषी विभागाचे अहवालावरुन वाहन चालक आरोपी नामे इमरान खान नासीर खान वय ३७वर्ष रा. बगड खिडकी वार्ड चंद्रपूर आणि माल मालक नामे सुमित नगराळे रा.आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांचेविरुध्द पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्रमांक ४२१/२०२५ कलम २२३ भारतीय न्याय संहिता सहकलम १४, ७ (अ), ७ (क), ७(ड), १९ बीज अधिनियम १९६६ व बियाणे नियंत्रक आदेश १९८३ चे कलम ३,८,१ तसेच बियाणे नियम १९६८ चे कलम ८,९,१०,११ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ८,१५, १५(१), (२),१६(१)(२) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (ड) ७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे व पोलीस निरीक्षक श्री. श्याम गव्हाणे पो. ठाणे बल्लारपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री. दिपक कॉकेंडवार व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस ठाणे बल्लारपूर येथील अंमलदारांनी केली आहे.
0 Comments