मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे माझी वसुंधरा अभियान
◾ प्लास्टिक मुक्त भारत आणि झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व - इब्राहिम जव्हेरी
◾ भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देण्यासाठी Reduce Reuse Recycle - मुख्याध्यापिका आसमा खान खालिदि
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक 1 मे 2025 रोजी मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जागतिक वसुंधरा दिनानिमित्य दिनांक 22 एप्रिल 2025 ते 1 मे 2025 या कालावधीत पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या उपक्रमा अंतर्गत चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा आणि Reduce,Reuse, Recycle यावर आधारित विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा समारोप महाराष्ट्र दिनाच्या दिवशी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बल्लारपूर सेवा समितीचे सचिव माननीय इब्राहिम जव्हेरी व अध्यक्ष शाळेच्या प्राचार्य माननीय आसमा खान खलीदी मॅडम यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या समारोपीय कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख पाहुणे माननीय इब्राहिम जव्हेरी यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त भारत आणि झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय आसमा खान खालिदि मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देण्यासाठी Reduce Reuse Recycle चे महत्व विषद केले. व मान्यवरानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका सीमा धाडवे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
0 Comments