१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
◾पत्रपरिषदेत विराआंस चे अॅड. वामनराव चटप यांची माहिती
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : विदर्भ महाराष्ट्रात आहे. पण विदर्भाचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. विदर्भातील लोक ज्वलंत समस्यांना तोंड देत आहेत. सर्व समस्या आणि ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भाला स्वतंत्र राज्य बनविने आवश्यक आहे आणि म्हणूनच १ मे रोजी निषेध दिन साजरा करून हे स्वतंत्र राज्य साध्य करता येईल. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती. अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, ४ वर्षे द्विभाषिक मुंबई राज्यात राहून व ६४ वर्षे मराठी भाषिकाच्या महाराष्ट्र राज्यात राहून नागपूर कराराप्रमाणे कबुल केल्याप्रमाणे सिंचनाचा ६० हजार कोटीचा अनुशेष भरून न निघाल्यामुळे विदर्भातील 131 धरणे पुर्ण होऊन १४ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊ शकली नाही. तसेच सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उर्जा, रस्ते, पिण्याचे पाणी, ग्राम विकास, आदिवासी विकास व समाज कल्याण विभागाचा १५ हजार कोटीचा अनुशेषही भरुन निघालेला नाही. त्यामुळे विदर्भातील विकास खुंटला असून विदर्भाच्या वाट्याला शेतकरी आत्महत्या, सोशिओ एकॉनॉमीक प्रश्न असलेला नक्शलवाद, प्रदुषण, कुपोषण व त्यामुळे गर्भार माता व बालमृत्यु व वाढलेली बेरोजगारी इत्यादी प्रश्न आ वासून उभे राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असून राज्याचे महसुली उत्पन्न ५,६०,९५3 कोटी असून वर्षाचा खर्च भागविण्याकरिता रु. ६,०६,८५५ कोटी रुपये लागणार आहेत. राज्याचा अर्थ संकल्प ४५,८९२ कोटी रुपये तुटीचा असून राज्यावर कर्जाचा डोंगर हा ७,८२,००० कोटीचा असून व्याजादाखल ५६,७२७ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. विदर्भ १०० वर्षे महाराष्ट्रात राहिला तरी विदर्भाचे ज्वलंत प्रश्न सुटू शकत नाहीत व विकासही होऊ शकत नाही. म्हणून या सर्व प्रश्नाचे उत्तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य हेच आहे आणि म्हणून १ मे हा निषेध दिन म्हणून पाळाणार असून तो काळा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ४ या वेळात वि.रा.आं.स. धरणे आंदोलन करणार असून विदर्भातील शेतक_यांच्या आत्महत्या थांबविण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश आल्यामुळे केन्द्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे ही मागणी केली जाणार आहे व सर्व विदर्भवादी आंदोलक काळ्या पट्ट्या बाहुवर, डोक्यावर व छातीवर लावणार आहेत.
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये गावा-गावात पोहचण्याच्या दृष्टीने व जन-जागरण करण्याच्या दृष्टीने पश्चिम विदर्भातील सरपंच, कंत्राटी शिक्षक, तासीकेवर काम करणारे शिक्षक व विना अनुदानित तत्वावरिल शाळा, कॉलेज व आश्रम शाळांमध्ये काम करणारे शिक्षक व बेरोजगार यांचे मध्ये आंदोलनाची धग पेटविण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न कायम निकाली निघण्याचे दृष्टीने विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे. हे पटवून देऊन त्याही समुहाचा विदर्भ आंदोलनात सक्रीय सहभाग वाढविण्याचे दृष्टीने दि. २५ मे, २०२५ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळात अभियंता भवन, शेगांव नाका, अमरावती येथे पश्चिम विदर्भाचा मेळावा वि.रा.आं.स. चे वतीने आयोजीत करण्यात आलेला आहे. त्यात वरिल विषयावरिल सर्व तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. यात विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन वि.रा.आं.स. ने केले आहे.
पत्रपरिषदेला एड. वामनराव चटप, किशोर दहेकर, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, मुन्ना आवळे, मुन्ना खोब्रागडे, मारोतराव बोथले, सुधीर सातपुते, अरुण सातपुते आदी उपस्थित होते.
0 Comments