जगन्नाथ बाबा मठात महाप्रसाद दिनी सुमधूर भजनाचा कार्यकम

 



जगन्नाथ बाबा मठात महाप्रसाद दिनी सुमधूर भजनाचा कार्यकम

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) :  श्री जगन्नाथ महाराज मठ, दाताळा मार्ग, चंद्रपूर येथे घुगरी काला (महाप्रसाद) निमित्त श्री गुरूदेव सेवा भजन मंडळ, स्वावलंबी नगर, नगीनाबाग यांच्या वतीने दि. १६ जानेवारी २०२५ रोजी भजनाचा कार्यक्रम पार पडला.

या भजन कार्यकमास जगन्नाथ महाराजांचे भक्त मंडळी, सेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी भजन मंडळाचे सदस्य रमेश मोरे, गजानन झाडे, सुनिल चवले, रघुवीर झाडे, भागवत शेंडे, राजु टोंगे, नंदाबाई नक्षिणे, तबलावादक भास्कर निंबाळकर, हार्मोनियम वादक विशाल लोनबोले, बेबीताई वाटेकर, प्रभाकर पुंड, वंदना मोरे, सविता झाडे, प्रतिभा चवले, मंगला झाडे, प्रमिला शेंडे, इंदिरा गुरले, रूपाली टोंगे, विलास माकोडे, काजल झाडे, सुनिता मुरस्कर व इतरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी जगन्नाथ बाबा मठाच्या संचालकांनी या भजन मंडळाच्या कार्याची स्तुती करून त्यांना शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

0 Comments