चिमूर येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडीया यांच्या हॅट्रिक विजयी
◾116495 + 9853 कीर्तीकुमार बंटी भांगडीया
◾106642 - -9853 डॉ. सतीश वारजुकर मत
◾चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विजयोत्सव व महारॅली
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अतिशय चुरशीची होणार असे चित्र दिसून येत होते. नागरीक याबाबत चौकाचौकात चर्चा सुद्धा करायची, कोणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ मात्र आज दिनांक २३ नोव्हेंबरला अखेर निकाल जाहीर झाला आणि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना मत 116495 मिळाली आणि काँग्रेसचे डॉ. सतीश वारजुकर याला 106642 मत मिळाली आहेत.
भाजपा महायुतीचा उमेदवार किर्तीकुमार भांगडीया 9853 मतांनी विजयी झाले.
यांनी चिमूर या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली.
त्यांची लढत काँग्रेसचे बलाढ्य नेते डॉ. सतीश वारजुकर यांच्याशी होती त्यांना मागे ठेवत हॅट्रिक साधली. चिमूर तहसील कार्यालय पासून महारॅलीची सुरुवात झाली असून मुख्य रस्त्याने मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.बाजार पेठेतुन रॅली श्रीहरी बालाजी मंदिर येथे आली किर्तीकुमार भांगडीया यांनी श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी रॅलीत कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.














0 Comments