चंद्रपूर येथे एक बनावटी देशी कट्टा बरोबर आरोपीला अटक
◾स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने गोपनीय सापळा कारवाई करत आरोपीकडून देशी कट्टा जप्त केले.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक 25/11/24 रोजी स्था. गु. शा. चंद्रपूर ने पो. स्टे. रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपिनीय माहिती वरुन आरोपी नरेश भीक्षपति तूरपाटी वय 25 रा.यादगिरी ता. यादाद्री जिल्हा नलगोंडा राज्य. तेलंगाना हल्ली मु. नरेंद्र नगर , जैन लेआऊट बायपास रोड चंद्रपूर , याचे कडे गावठी देशी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली असता, आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती घेतली असता एक बनावटी देशी कट्टा मिळून आल्याने देशी कट्टा जप्त करुन आरोपीस ताब्यात घेऊन पोस्टे रामनगर येथे अप क्रं १११८/२०२४ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील कारवाई करीता पोस्टे रामनगर यांचे ताब्यात दिले .
कारवाई पथक पो.उप.नि मधुकर सामलवार , पो.हवा दीपक डोंगरे ,ना.पो.का. संतोष येलपुलवार, पोका. गोपाल आतकुलवार , गोपीनाथ नरोटे, सर्व स्था. गु. शा. चंद्रपूर.












0 Comments