शेख जुम्मन रिझवी शासकीय अल्पसंख्यांक कल्याण समितीवर निवड









शेख जुम्मन रिझवी शासकीय अल्पसंख्यांक कल्याण समितीवर निवड

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेता शेख जुम्मन रिझवी यांची शासकीय अल्पसंख्यांक कल्याण समिती जिल्हा चंद्रपूरच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मा. प्रधानमंत्र्यांच्या अल्पसंख्यांक कल्याण प्रयोजनार्थ राबविण्यात असलेल्या १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या समितीच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासाच्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न या कल्याण समितीच्या माध्यमातून होणार आहे.

शेख जुम्मन यांनी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष (ग्रामिण) पदाची सुत्रे प्रभावीपणे सांभाळून अल्पसंख्यांकाच्या सामाजिक उत्थानासाठी भरीव कार्य केले आहे. विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमात अल्पसंख्यांकाना सहभागी करित पक्षाची विचारधारा व अल्पसंख्यांकाविषयी असलेली भाजपाची कार्यप्रणाली, विकास योजना पोहचविण्यात त्यांनी परिश्रम घेतले आहे. जुम्मन रिझवी यांचे कार्य सर्वसमावेशी असल्याने व भाजप नेत्यांशी असलेल्या थेट संपर्कातून त्यांनी अल्पसंख्याक मोर्चाचे कार्य विस्तारण्यात बहुमूल्य योगदान दिले आहे.

कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, अल्पसंख्यांक महिलांचे आर्थिक सक्षमीकरणाचा विषय असो, जुम्मन रिझवी यांचे कार्य नेहमीच प्रशंसनिय राहीले आहे. त्यांनी जिल्ह्यात महिलांचे शेकडो बचत गट उभारून मुस्लिम अल्पसंख्याक भगिनींच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदान दिले आहे. नुरी ताज फाऊंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी सामाजिक उत्थानाच्या कार्याला गती देण्याचा कसोशिने प्रयत्न केला आहे.

शासकीय अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समुदायाच्या उन्न्तीकरीता आपण विशेष परिश्रमातून त्यांचे अधिकार मिळवून देवू अशी भुमिका रिझवी यांनी व्यक्त केली. या समितीवर जबाबदारी सोपविल्याबद्दल राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, हरिश शर्मा, देवराव भोंगळे, विजय राऊत, खुशाल बोंडे, डॉ. गुलवाडे, राहुल पावडे आदी नेत्यांचेही विशेष आभार मानले आहे.

शेख जुम्मन रिझवी यांच्या सदस्यपदी नियुक्तीचे सय्यद सज्जादअली, जहीरखान कादरी, अमिन शेख, अजहर शेख, रामधन सोमानी, इनायत शेख, सलीम नबी अहमद, भास्कर पेन्दोर, शब्बीर अलीयार मोहम्मद, रोहित तेलंग, शेख करीम, देवा वाटकर, सईद कुरेशी, हाजी जुबेर, दिनेश शितूत, सैजाद अली सय्यद, अजिम बेग, मुन्ना इलटम, समिर पटेल, शेख हुसैन, अमिर खान, शेख फरीद, नफीस अन्सारी, शेख युसूफ, जिब्राईल खान आदिंनी स्वागत करून शेख जुम्मन रिझवी यांच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. कोराना काळातील त्यांचे कार्य प्रशंसनिय असल्याने कोरोना योध्दा व शेतकरी मित्र म्हणून दें. नवभारत समुहा तर्फे वर्ष २०२१ ला मराठी अस्मितेच्या पुरस्कारानेही शेख जुम्मन रिझवी सन्मानित झाले आहेत.





Post a Comment

0 Comments