राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु हुसेन यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 




राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु हुसेन यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु  हुसेन व इतर दोन सदस्य यांचा दिनांक 30 व 31 जुलै 2024 रोजी चंद्रपूर जिल्हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर  दौरा कार्यक्रमादरम्यान ते चंद्रपूर जिल्हयातील विविध  आदिवासी मुला/ मुलींचे वसतीगृह यांना भेटी देणार असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय यंत्रणेशी  ‍विविध विषयावर चर्चा करुन नियोजन भवन चंद्रपूर येथे 31 जुलै रोजी आढावा घेणार आहेत.

संपर्क अधिकारी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments