अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वारचा मृत्यू



अज्ञात  वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वारचा मृत्यू  

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) :  राजुरा गडचांदूर मार्गावर रास्ता चौपादरीकरण्याचे कार्य वेगवान गतीने सुरू आहे. दिनांक 10 मार्च रोजी रात्री 9:30 ते 10   वाजताच्या सुमारास राजुरा मार्गे गडचांदूर  जाणारी दुचाकी वाहन क्रमांक MH 34 DX 2550 याला अज्ञात वाहनाने धडक दिली यात दुचाकीस्वार दुचाकीवरच पडलेल्या  अवस्थेत वाहतूक करणाऱ्या प्रवासांना आढवला, त्यांनी याची माहिती राजुरा पोलीसांना दिली.

राजुरा - गडचांदूर मार्गावर पांढरपणी जवळ अज्ञात  वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी  पडलेल्या अवस्थेत आढळून आला, त्याच्या मृत्यू घटनास्थळी झाला असल्याची चर्चा आहे.

राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले अजून दुचेकी सवार ची ओळख अजून पटली नसून त्याचे जवळ कमांडो बॅग आहे. सदर अपघातग्रस्त व्यक्तीला जखमी अवस्थेत राजुरा पोलीस स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचार साठी हलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहे.



Post a Comment

0 Comments