राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे 2023 थाटात उदघाटन, राज्यस्तरीय खेळाळूची उपस्थिती

 



राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे 2023 थाटात उदघाटन, राज्यस्तरीय खेळाळूची उपस्थिती 

◾तालुका क्रीडा संकुल विसापूर, बल्लारपूर




बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्याचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपुर द्वारे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2023 चे 10 मार्च ते 12 मार्च पर्यंत तालुका क्रीडा संकुल विसापूर, बल्लारपूर येथे आयोजन करण्यात आले असून या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन आज 11 मार्चला होत असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मा. ना सुधिरभाऊ मुनगंटीवार वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा. शेखर पाटील क्रीडा उपसंचालक नागपूर विभाग, मा.चंदनसिह चंदेल, माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य देवरावजी भोंगळे, मा. हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, मा. दीप्ती सूर्यवंशी पाटील उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, मा. स्नेहल रहाते, तहसीलदार बल्लारपूर, मा. अविनाश पुंड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर, आशिष देवतळे ई ची उपस्थिती होती यावेळी बोलतांना सुधिरभाऊ म्हणालेत की, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या खेळाळूना मोफत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं दर्शन घडविण्यात येइल तसंच तालुका क्रीडा संकुल लगत लागून असलेलं बॉटनिकल गार्डन काही तासा करिता विद्यार्थ्यांना पाहण्याकरिता खुलं करण्यात येइल तसंच सैनिक शाळा चंद्रपुरचेही अवलोकन विद्यार्थ्यांनी करावे या स्पर्धेकरिता राज्यभरातून 225 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली तसेच विद्यार्थ्यांसोबत 175 पालकांनी उपस्थिती लाभली असून यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येइल. 

यावेळी तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर साठी जवळपास 83 लक्ष रु ची सोलर सिस्टिम उपलब्ध करून दिली आहे तसंच चंद्रपुरात विर बाबुराव शेडमाके इंडोर स्टेडियमच बांधकाम करण्यात येत आहे जे पूर्णतः सोलर सिस्टिमवर अवलंबिले असेल. या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी मुंबई विभाग, लातूर विभाग, नाशिक विभाग, विभाग, कोल्हापूर विभाग, अमरावती विभाग, पुणे विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग ई विभागाच्या खेळाळूची  उपस्थिती होती. यावेळी राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रात  यश व पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



Post a Comment

0 Comments