WCL (वेकोलि) कर्मचाऱ्यांची गळफास घेवून आत्महत्या


WCL  (वेकोलि) कर्मचाऱ्यांची गळफास घेवून आत्महत्या 

◾बल्लारपूर संपवेल पंप, गणपती ( विसर्जन ) घाट परिसरात गळफास घेवून वेकोलि कर्मचाऱ्यांची आत्महत्या 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील संपवेल पंप, गणपती( विसर्जन )  घाट परिसरात आज सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास एका अनोळखी इसमाने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 

या संदर्भातील अधिक माहितीनुसार बल्लारपूर शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड येथील निवासी असलेले प्रशांत पिंपळशेंडे वय - 30 वर्षे हे वेकोली मध्ये कार्यरत असून आज सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास बल्लारपूर शहरातील गणपती घाट परिसरात संपवेल क्वार्टरच्या लगत एका वृक्षाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या मृतदेह आढळून आला. सदर इसमाने निळ्या रंगाचा पॅन्ट व कत्था रंगाची जर्सी परिधान केल्याचे दिसून येत आहे. सदर इसमाने आत्महत्या का केली याच अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र या संदर्भाचा पुढील तपास मा. उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद रासकर करीत असून सदर व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments