आयुध निर्माणी चांदा येथील ओबीसींची रिक्त पदे भरण्याची प्रकीया येत्या 3 महिण्यात पूर्ण करावी - हंसराज अहीर
◾राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांचेद्वारा सुनावणी प्रसंगी कर्मचारी आरक्षण, अनुकंपा प्रकरणे, आरक्षण रोस्टर, विविध समस्यांचा आढावा.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आयुध निर्माणी चांदा येथील सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या आरक्षण विषयक धोरण, आरक्षण रोस्टर व अन्य प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी महाप्रबंधक व अन्य वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेवून सुनावणी केली.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि. 28 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सुनावणीत अध्यक्षांनी या निर्माणीमध्ये वर्तमानात कार्यरत ओबीसी प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी व कामागारांच्या आरक्षण विषयक कार्याचा आढावा घेतला. ओबीसी प्रवर्गातील (मागासवर्गीय) अधिकारी व अन्य संवर्गातील रिक्त पदे आवश्यक कार्यवाही करून तातडीने भरण्याकरिता कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. येत्या 3 महिण्यांत भरती प्रक्रीयेबाबत निर्णय घेण्याच्या सुचना महाप्रबंधकांना केल्या.
अनुकंपा तत्वावरील सुमारे १२० प्रकारणांपैकी ३२ अनुकंपा धारकांची प्रकरणे मंजूर झाली असल्याची माहिती यावेळी महाप्रबंधकांनी अध्यक्ष महोदयांना दिली. यापैकी ओबीसी प्रवर्गातील किती प्रकरणे प्रलंबीत आहेत अशी विचारणा करीत याबाबतची सविस्तर माहिती आयोगास सादर करण्याची सूचना केली. आयुध निर्माणी मध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगार भरतीमध्ये आरक्षण निकषावर अमलबजावणी होते किंवा कसे याबाबत माहिती घेत कंत्राटी कामगारांच्या नेमणुका करतांना स्थानिकांना प्राधान्य देत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचा प्राधान्याने विचार करावा असे निर्देश सुनावणी दरम्यान दिले. आयुध निर्माणीतील आरक्षण रोस्टरची वार्षिक पडताळणी अनिवार्य करून या बाबतचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास सादर करण्याच्या सुचना करून ओबीसी प्रवर्गातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या न्यायोचित मागण्या, प्रश्न व समस्यांच्या निवारणार्थ ओबीसी कल्याणकारी संघटनेच्या स्थापनेकरिता निर्णय घेत या संघटनेस स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्याबाबत प्राधान्याने विचार केल्या जावा अशी सुचनाही अध्यक्ष महोदयांनी या सुनावणी दरम्यान महाप्रबंधकांना केली.
सदर सुनावणी दरम्यान आयुध निर्माणी चांदा चे बिजोय कुमार, उपमहाप्रबंधक (प्रशासकीय) श्री. पाटील, भद्रावती नप चे पुर्व नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, पुर्व नगरसेवक प्रशांत डाखरे, पुनम तिवारी आदींची उपस्थिती होती.





0 Comments