बल्लारपुर शहरातील वस्ती विभाग येथे नवीन देशी दारू दुकानाला महिलांचे विरोधा



बल्लारपुर शहरातील वस्ती विभाग येथे नवीन देशी दारू दुकानाला महिलांचे  विरोधा

◾पुट-पातवर काही दुकानदार अतिक्रमण करून दुकानदारी करत आहे, बल्लारपूर नगर परिषद च्या दुर्लक्ष ?  

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : शहरातील वस्ती विभाग येथील राणी लक्ष्मी वार्ड, किला वार्ड, गांधी वार्ड आणि या परिसरातील महिलांनी नवीन  देशी दारू दुकान विरोधात तिन्ही वॉर्डातील महिलांनी एकजुटीने सर्व प्रशासकीय अधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देऊन या भागात नवीन देशी दारूचा  दुकान उघडण्याची परवानगी रद्द करून दुसरीकडे हलविण्यात यावी असे आशियाचे निवेदन दिले आहे.

 महिलांचे म्हणण्यानुसार या परिसरात मागील पन्नास वर्षे पासून इथे वास्तवात आहे. या परिसरात जव्हेरी कन्या शाळा, जनता सिटी ब्रँच शाळा, देवस्थान, तसेच दिवाणी न्यायालय 100 मीटर चा आत आहे. इथेच जवळ एका   घरी लहान मुलांना शिकवणी वर्ग घेतात त्याचाच बाजूला सागर बियर शॉपी उघडण्यात आली आणि आर.के. बार पण चालू आहे. या दोन्ही दुकानामुळे शिकवणी करिता येणारे लहान मुलांना नाहक त्रास होत असून मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बाजूला एक नवीन  देशी दारू दुकान उघडण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच बाजूला उज्वला बार आहे. या  बार ला पार्किंग नसल्याने बार चा बाजू ने लोकवस्ती कडे जाणाऱ्या मार्गावर बार मध्ये येणारे लोक रस्त्यावरच गाडी लावल्याने वस्तीतील लोकांना येणे ज्यांना  करिता खूबच त्रास होत आहे. शहरातील वस्तीतील लोकांना येणे - जाणाऱ्या मार्गावर पुट-पातवर  काही दुकानदार अतिक्रमण करून दुकानदारी करत आहे, बल्लारपूर नगर परिषद च्या दुर्लक्ष ?  

 रोज काहींना काही कारणावरून भांडणे होत राहतात, येथे शिक्षणघेण्या करिता येणाऱ्या मुलामुलींना मानसिक त्रासाला सामोरे जावा लागत आहे ,वॉर्डातील स्थानिक लोकांना एवढे मोठे नुकसान होत आहे. तरी नवीन  देशी दारू दुकान चालू होतं असेल तर साधारण नागरिकांनी न्यायकरिता जावे कुठे, राज्य उत्पादन शुल्क विभाग ने सर्व नियम डावलून परवानगी दिलीच कशी? राज्य उत्पादन शुल्क चे जिल्हा आयुक्त संजय पाटील यांना वॉर्डातील महिला यांनी प्रश्न उपस्थित केला आहे? या विभागातील महिलांनी देशी दारू दुकान चा परवाना रद्द नाही केल्यास या योग्य निर्णय न झाल्यास येथिल महिला या विरोधात मोठे आंदोलने करण्याचा तयारीत आहेत. स्थानिक महिलांनी PWD गेस्ट हाऊस वर घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये महिला व पुरुष आपली व्यथा जाहीर केली.




Post a Comment

0 Comments