महादेव मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरी; 83679 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपींना अटक

 



महादेव मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरी;  83679 रुपयांचा मुद्देमाल जप्त,  3 आरोपींना अटक



चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शहरातील बाबूपेठ परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरी गेल्याची खळबळजनक घटना घडली त्याच दिवशी त्याच परिसरात एका घराची घरफोडीची घटना घडली यात शहर पोलीसांनी 3 आरोपींना अटक करून एकूण 83679 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजु शंकरराव कृष्णपुरकर 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजताचे दरम्याण नेहमी प्रमाणे महादेव मंदीरा कडे पाहीले असता कोनीतरी अज्ञात चोरटयोनी मंदीराचे कुलुप तोडुन मदंराची दानपेटी फोडुन अंदाजे 10,000 / रूपये चोरस गेले अशी फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली, पोस्टे अप क्र. 108/2023 कलम 457,380 भादविचा नोंद करूण तपासात घेतला.

त्याच बाबूपेठ परिसरातील सुरजसिंग पारसनायसिंग ठाकुर  22 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्याण घराला कुलुप लावुण कामा निमीत्य बाहेर गेले व परत आल्यावर पाहीले असता घराच्या मुख्य दाराला लावलेला कुलुप कोन्डा तोडलेला दिसुण आला व घरातील सामान अस्थाव्यस्त पसरलेला दिसुण आला तसेच घरातील लोखंडी अलमारी उघडे दिसले व त्यात ठेवलेला चांदीचे 5 जोड पायपंट्टी 100 ग्राम रूपये, कमरेचा छल्ला दोन नग 20 ग्रॅम, लहान मुलांचे चांदीचे कडे वनज 05 ग्रॅम, चांदीचा लक्ष्मी सिक्का वनज 10 ग्राम, आसुस कंपनीचा ल्यापटॉप किंमत 12,000/रूपये असा माल चोरी गेल्याची  तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली, पोस्टे अप क्र. 109/2023 कलम 457,380 भादवि नोंद करूण तपासात घेतला.

शहर पोलीसांनी तपास यंत्रणा वापरत मुखबीर कडुन 23 फेब्रुवारीला माहिती मिळाली की, तिन मुल सैनीक शाळा बल्लारशा रोड समोरील पडक्या घरात बसुण नशा करीत आहे. तेव्हा सदर मुलांना चेक करण्या करीता डि.बी. पथकासह जाऊन ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवत अंगझडती घेतली असता चोरी गेलेले सोने चांदीचे दागिने, नगदी 10,979/- रूपये, दोन लोखंडी टॉमी किंमत अंदोजे 200/- रूपये, होन्डा डि ओ. क्र. एम. एच. 34 बि. डब्ल्यु 9159 किंमत 50,000/-  रूप्ये असा एकुन 83679 /-  रूपयाचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला यात आरोपी अक्षय सुधाकर घुबडे 28 वर्षे रा. राजुरा, मय्युदीन मनसुर आलेख वय 26 वर्षे व सोहेल जावेद शेख वय 20 वर्षे दोन्ही रा. गडचांदुर जि. चंद्रपुर यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास अनुकमे पोहवा विलास निकोडे, साफौ. शरीफ शेख करित आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधीकारी चंद्रपुर सुधीर नंदनवार, तसेच पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि मंगेश भोंगाडे, तथा पो. कर्म. सफौ शरीफ शेख, पो. हवा. महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, चेतन गज्जलवार, सचीन बोरकर, संतोष पंडीत, दिलीप कुसराम, इरशाद खॉन, इम्रान खॉन, रूपेश रणदिवे सर्व गुन्हे शोध पथक पो. स्टे. चंद्रपुर शहर यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments