मागासवर्गीय ( WCL ) वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या वैद्यकीय अपात्रतेची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाव्दारे दखल

 





मागासवर्गीय ( WCL ) वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या वैद्यकीय अपात्रतेची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाव्दारे दखल

◾वेकोलि ( WCL ) सीएमडी यांना चौकशी व हस्तक्षेप करण्याची सुचना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : वेकोलि ( डब्लु.सी.एल ) कोळसा खाणीकरिता चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोठ्या प्रमाणात अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत परंतु नामनिर्देशित प्रकल्पग्रस्तांना नौकरी देतांना वेकोलि प्रबंधनाव्दारे वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवून नोकरीपासुन वंचित ठेवण्याचा सपाटा चालविला असल्याची तक्रार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचेकडे संबंधित प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक (सी.एम.डी) यांना पत्र पाठवून मागासवर्गीय वेकोलि प्रकल्पग्रस्तांना अपात्र ठरविण्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करुन विनाकारण या प्रकल्पग्रस्तांचा मानसिक छळ होणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना केली आहे. प्रस्तुत प्रकरणात माहिती घेवून याबाबतचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयास सादर करण्याच्या सुचनाही आयोगाने पत्राव्दारे केल्या आहेत.



Post a Comment

0 Comments