बल्लारशाह ते मुंबई आणि बल्हारशाह ते पुणे दररोज गाड्या चालवाव्यात; चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसीएशन, बल्लारपूर द्वारे हंसराज अहिर यांना निवेदन
◾अखिल भारतीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना निवेदन देण्यात आले.
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : सहा डब्यांची लिंक एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज धावत होती, मात्र कोरोनाच्या कालावधीनंतर ती बंद पडल्याने प्रवासी, विशेषत: कर्करोगग्रस्त, छोटे व्यापारी, मंत्रालयात अत्यावश्यक कामासाठी जाणारे लोक, स्वयंरोजगार आणि इतर नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच बडनेरा, शेगाव, जळगाव मनमाड, नाशिक आदी धार्मिक स्थळी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे बल्लारशाह ते मुंबई दररोज रेल्वे धावण्याची मागणी नगरकरांनी केली आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्र. 22151 काझीपेठ पुणे आठवड्यातून एकदा ऐवजी दररोज चालवण्याची मागणी होत आहे.
चंद्रपूर जिल्हा सह बल्लारपूर तालुक्यातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेले आहेत. तसेच काही लोक कामाच्या शोधात पुण्यात स्थायिक झाले आहेत. ज्यांना पुणे ते बल्लारशाह प्रवास करताना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही गाडी काजीपेठ ते पुणे दररोज चालविण्यासोबतच या गाडीला विद्यार्थी एक्स्प्रेसचे नाव देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हा सह बल्लारपूर तालुक्यातील हजारो प्रवाशांच्या मागण्यांबाबत लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे हंसराज अहिर यांनी सांगितले.
निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसीएशन बल्लारपूरचे अध्यक्ष व झेडआरयूसीसी सदस्य, मुंबई मध्य रेल्वे श्रीनिवास सुंचुवार, सहसचिव व डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर, गणेश सैदाणे माजी सदस्य रेल्वे सल्लागार समिती, विनोद काबरा सदस्य रेल्वे सल्लागार समिती, प्रशांत भोरे सदस्य समिती, रामेश्वर पासवान, ज्ञानेंद्र आर्य सह चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसीएशन, बल्लारपूरच्ये सदस्य उपस्थित होते.







0 Comments