पत्रकार दिनी महापुरुषांना अभिवादन ! महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बल्लारपुर शाखेचा उपक्रम

  




पत्रकार दिनी महापुरुषांना अभिवादन ! महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बल्लारपुर शाखेचा उपक्रम 


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : 6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

या अनुषंगाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपूर च्या वतीने शहरातील महापुरुषांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले यावेळी बल्लारपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपूर चे तालुकाध्यक्ष आयु. मनोहर दोतपल्ली, उपाध्यक्ष आयु. देवानंद देशभ्रतार, सचिव आयु. दिपक भगत, सहसचिव आयु. लखपति घुगलोत, कोषाध्यक्ष आयु. वसंत मून, यांच्या सह संघाचे मान्यवर सदस्य आयु. विशाल डुंबेरे, धनंजय पांढरे, गौतम कांबळे, श्रीनिवास सिंगाराव, नीलकंठ मजगवली, गणेश टोंगे, मिलींद पुणेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments