पोलिस राइज़िंग दिवस निमित्य एन.सी.सी. कैडेट्स ची रैली

 



पोलिस राइज़िंग दिवस निमित्य एन.सी.सी. कैडेट्स ची रैली


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय व गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपुर द्वारा  बल्लारपुर शहरात पोलिस राइज़िंग डे आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय ते पोलीस ठाणे बल्लारपूर पर्यंत रैली काढण्यात आली.  21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा च्या वतीने कमांडिंग ऑफिसर कर्नल घोष आणि प्रशासनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल  मुरुगेसन यांच्या मार्गदर्शनात तर ले. डॉ. महेशचंद शर्मा आणि ले.योगेश टेकाडे यांच्या नेतृत्वाखाली हा  कार्यक्रम राबविन्यात आला. 

पोलीस  रायजिंग डे   2 जानेवारी ते 7 जानेवारी हा सप्ताह राबविण्यात येत आहे. या कार्यक्रम निमित्त पोलीस ठाणे बल्लारपूर चे एपीआय विलास गायकवाड, एपीआय प्रमोद रातकर आणि पीएसआय चेतन टेंमभुरने यांनी पोलीस ठाण्यात उपलब्ध शस्त्राची माहिती देऊन पोलिस ठाण्याची कार्यप्रणाली ची माहिती देऊन छात्र सैनिकांचे मार्गदर्शन केले.

 सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना  पोलिस प्रति असलेली भीती कमी करणे व जनजागृती करणे हा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला. 

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपुर यांच्या संयुक्त विद्यामनाने या कायक्रमा चे आयोजित करण्यात आले यात दोन्ही महाविद्यालय यातील अनुक्रमे 42 आणि 33 एनसीसी कॅडेट्स आणि 2 एन सी सी अधिकारी, डॉ. पंकज कावरे, डॉ. विनय कवाडे  आणि सहकारी प्राध्यापक यांनी सहभाग घेतला. 

      महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती कल्याणी पटवर्धन आणि गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस पोकळे  यांचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. महेशचंद शर्मा आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट योगेश टेकाडे यांनी 'पोलीस रायजिंग डे व सावित्रीबाई फुले जयंती रॅली' ची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. तसेच दोन्ही महाविद्यालयाचे सीनियर कॅडेटस् यांनी या शिबिराचे आयोजन तथा यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान केले.



Post a Comment

0 Comments