महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभाग तसेच सैन्यशास्त्र विभागा तर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग व सैन्यशास्त्र विभागाद्वारे आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा.सौ. सविता पवार तसेच खेळ विभाग प्रमुख प्रा. बालमुकुंद कायरकर आणि सैन्य विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश टेकाडे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.सौ. कल्याणी पटवर्धन होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाविषयीची असलेली तळमळ आणि वाईट परिस्थितीतून मार्ग काढीत स्त्री शिक्षणासाठी चालविलेला आपला वसा तसेच आज त्यांच्या प्रयत्नातून वर्तमान काळात स्त्रियांनी उमटवलेला कर्तुत्वाचा ठसा इत्यादी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच समाजशास्त्र विभागाद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक योगेश टेकाडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राध्यापकवृद उपस्थित होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी कॅडेट आणि विद्यार्थी उपस्थित होते.






0 Comments