चालत्या वाहनातून पर्स बळजबरीने हिसकावणाऱ्या चोराला रामनगर पोलीसांनी अटक व 42800 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त





चालत्या वाहनातून पर्स बळजबरीने हिसकावणाऱ्या चोराला रामनगर पोलीसांनी अटक व 42800 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त

◾रामनगर पोलीसांची धडाकेबाज कारवाई

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुर वरून विसापूर जाणाऱ्या किराणा व्यावसायिकाचा पत्नीची चालत्या वाहनातून पर्स बळजबरीने हिसकावणाऱ्या चोराला रामनगर पोलीसांनी अटक केली व 42800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित उर्फ लुई रामदेव बहुरीया असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील किराणा व्यावसायिक देविदास बावणे पत्नी सह चंद्रपुर वरून विसापूर परत जात असताना एका मोपेड वाहन चालवत तोंडाला रुमाल बांधलेल्या इसमाने मागून येत बावणे यांच्या पत्नीची चालत्या वाहनात पर्स बळजबरीने हिसकावून पळ काढला अशी तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात 11 जानेवारी 2023 रोजी देविदास बावणे यांनी दिली रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. 29/2023 कलम 392 भांदवि प्रमाणे गुन्हा दाखल करीत तपासात घेण्यात आला. घटनेचे गांभीर्य बघता उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक रामनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीच्या शोधात रामनगर येथील डीबी पथक घटनास्थळी दाखल होत सदर ठिकाणची सीसीटीव्ही कॅमेरा ची फुटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपीच्या शोध लावला.

आरोपी रोहित उर्फ लुई रामदेव बहुरिया वय 24 वर्ष राहणार लालपेठ कॉलरी क्र. 3, चंद्रपुर याला अटक करत त्याच्याकडून पर्समधून चोरलेली 2300 /- रुपयांची रक्कम, लावा कंपनीचा मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व पर्स व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मोपेड असा एकूण 42800 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो. हवा. रजनीकांत पुट्ठावार, प्रशांत शेंदरे, दशरथ शेडमाके, विनोद यादव, किशारे वैरागडे, चिकाटे, मिलींद दोडके, आनंद, निलेश मुडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, विकास जाधव, भावना रामटेके यांनी केली.



Post a Comment

0 Comments