काँग्रेसचा इतिहास त्याग आणि देशभक्तीचा - माजी गटनेते देवेंद्र आर्य यांचे प्रतिपादन
◾ काँग्रेसच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला १३८ वर्षे झाली. ही सर्वसामान्य जनतेची होती. लोकमान्य टिळकापासून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या प्रमुख नेत्यांनी काँग्रेसची मोठी पाया भरणी केली. सेवा, त्याग व समर्पण ही काँग्रेसची त्रिसूत्री होती. महात्मा गांधीच्या नेतृत्वाने जागतिक पातळीवर काँग्रेसला नवी ओळख दिली. स्वातंत्राच्या लढाईत काँग्रेसचे योगदान सर्वश्रुत आहे.काँग्रेसचा इतिहास त्याग व देशभक्तीचा आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर नगरपालिकेचे माजी गट नेते देवेंद्र आर्य यांनी व्यक्त केले.
बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने बल्लारपूर येथील गांधी भवन येथे काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील प्रवासी देवेंद्र आर्य यांनी प्रवासातील अनुभव सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अब्दुल करीम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष व तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, मेघा भाले, रेखा रामटेके, इस्माईल ढाकवाला, नरसिंग रेब्बावार, राजेश नक्कावार, हेमंत मानकर, आकाशकांत दुर्गे, प्राणेश अमराज, डाँ. युवराज भसारकर, कार्तिक जिवतोडे, वर्षा दानव,ऍड. पवन मेश्राम,नरेश मुधडा,करण कामटे ,दुर्गराज आरेकर,मेहमूद भाई पठाण,स्नेहल बडघरे,प्रीतम पाटील ,कार्तिक जीवतोडे,सचिन तोटावर,प्राणेश अमराज, राजू बहुरीया,महेश सद्दाला ,नागेश मेदर,टिंकू रामिडवार,प्रफुल बपानवर,उमेश शेंडे,तिजारे मामु,आफताब भाई,कासीमभाई, मो.अंकुश, फारुखभाई,सादीकभाई व इतर कार्यकर्ते हजर होते यांची उपस्थिती होती.
दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भारत जोडो यात्रेतील सहभागी माजी न. प. गट नेते देवेंद्र आर्य, काटवली ( बामणी ) येथील नवनिर्वाचित सरपंच राजेश ढूमणे, इटोलीचे सरपंच तुळशीदास पिपरे, काँग्रेस चळवळीत योगदान देणारे अनिल खरतड, डेव्हीड काम्पेल्ली यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ प्रदान करून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. घनश्याम मुलचंदानी, अब्दुल करीम यांनी यावेळी काँग्रेस स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संचालन रवि कोडापे यांनी केले. आभार प्रदर्शन महेश सद्दाला यांनी केले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.






0 Comments